चमकोगिरी करणाऱ्या पोस्टर पुढाऱ्यांना लगाम

बॅनरसाठी ग्रामपंचायत, पोलीस ठाण्याची घ्यावी लागणार संमती

काळगाव, दि. 27 (वार्ताहर) – ढेबेवाडी येथे विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल बॅनर व होर्डिंग पोलिसांनी काढावयास लावले. मंगळवारी ही मोहिम राबविण्यात आली. यापुढे बॅनर लावण्याबाबत ग्रामपंचायत व पोलीस ठाण्याची संमती घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडे ठराविक शुल्कही भरावे लागणार आहे. पोलिसांच्या या धोरणामुळे चमकोगिरी करणाऱ्या पोस्टर पुढाऱ्यांना लगाम बसणार आहे.
ढेबेवाडी पोलीस ठाण्यांर्गत येणाऱ्या परिसरातील तळमावले, कुंभारंगाव, सणबूर, काळगाव आदी गावात शुभेच्छांचे बॅनर लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गावांमधील विविध चौक, मोक्‍याचे रस्ते, खांब आदी ठिकाणी डिजिटल पोस्टर, बॅनर, होर्डिंगने माखलेली नेहमीच दिसतात. बॅनरच्या वाढत्या प्रकारामुळे ढेबेवाडी परीसराला व गावांना विद्रुपीकरण येऊ लागले आहे. त्याचबरोबर विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे भजनावळे यांनी याबाबत स्वत: लक्ष घालून यावर तोडगा म्हणून बॅनर व होर्डिंग्ज लावण्याबाबत नियमावली तयार केली आहे. या नियमावलीमुळे यापुढे ढेबेवाडी परिसरात कोठेही बॅनर लावताना संबंधित ग्रामपंचायत व पोलीस ठाण्याची संमती घ्यावी लागणार आहे. या नियमामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबण्यास मदत होणार असून पोस्टर पुढाऱ्यांवरही चाप बसणार आहे. भजनावळे यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

-Ads-

होर्डिंग, बॅनरसाठी नियमावली
होर्डिंग लावण्यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत प्रशासनाची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय संबंधित जागेच्या मालकाची लेखी अनुमती घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडेही शुल्क भरावे लागणार आहे. होर्डिंग्ज जितके दिवस लावायचे असेल त्या दिवसांचे शुल्क संबंधितांनी भरावयाचे आहे.

ढेबेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सर्व गावांमध्ये विविध प्रकारचे बॅनर लावण्यात आले होते. संबधित व्यक्‍तींना पोलिस पाटील व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे होर्डिंग्जबाबत ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या कारवाईमुळे ढेबेवाडी भागातील 100 हून जास्त बॅनर काढण्यात आले आहेत.
उत्तम भजनावळे
– सहाय्यक पोलीस निरीक्षक,

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)