चपाती उद्योजकांनी काळानुरूप बदलाव-विजय काळे

वाकड – सर्व चपाती उद्योजकांनी काळानुरूप उद्योगात आणि स्वतःत परिवर्तन घडवून उद्योगाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन चपाती उद्योगाचे शिल्पकार विजय काळे यांनी केले. दत्त नगर, थेरगाव येथे पुणे जिल्हा चपाती उत्पादक संघटनेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महापौर राहुल जाधव, उद्योजक राजकुमार धुरगुडे, गोरख भोरे, चपाती उद्योगाचे शिल्पकार विजय काळे, अमित गोरखे आदी मान्यवरा सह शहरातील चपाती उद्योजक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या चपाती उद्योगास महापालिकेच्या वतीने सर्वोपतरी मदत केली जाईल, असे आश्वासन महापौर राहुल जाधव यांनी दिले. संघटनेचे अध्यक्ष हेमकांत महामुनी म्हणाले विखुरलेल्या चपाती उद्योजकांनी पुणे जिल्हा चपाती उत्पादक संघटनेच्या न्याय हक्काच्या लढ्यात सामील व्हावे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष हेमकांत महामुनी, उपाध्यक्ष रुपेश घुले, महिला उपाध्यक्ष सुवर्णा चव्हाण, सचिव राजेंद्र भोईटे, कोषाध्यक्ष खंडेराव जमादार आदींनी परिश्रम घेतले. सुनील पवार यांनी सूत्रसंचालन केले. किशोर अहिरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)