चतु:शृंगी देवीला यंदा दीड किलो सोन्याचा मुकुट

ट्रस्टचे अध्यक्ष अनगळ यांची माहिती : नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

पुणे – चतु:श्रुंगी देवस्थान ट्रस्टची नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, यंदा देवीच्या शृंगारात दीड किलो वजनाचा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. चतु:श्रुंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुहास अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त दिलीप अनगळ यांनी माहिती दिली.

-Ads-

दि. 10 ऑक्‍टोबर ते 18 ऑक्‍टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव सुरू राहणार असून, दि. 10 ऑक्‍टोबरला सकाळी आठ वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते नऊ अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार असून, सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती होईल. गणपती मंदिरात भजनांचा कार्यक्रमही होणार आहे. यावर्षीही देवीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गुरूवारी दि. 18 ऑक्‍टोबर रोजी दुपारी पाचपासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून निघणार आहे.

यंदाचे सालकरी हे किरण मधुसूदन अनगळ असणार असून, पौरोहित्य नारायण कानडे गुरूजी यांच्याकडे आहे. देवीसाठी दीड किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बनवण्यात आले आहे. याशिवाय पोलीस, होमगार्ड, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षारक्षक असणार आहे. 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. किटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाण्यात जंतुनाशके टाकणे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. निर्माल्यापासून खत निर्माण करण्याचा प्रकल्पही करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिकेची व्यवस्थाही घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत करण्यात येणार आहे. पॉलिटेक्‍निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भक्‍तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्तनदा मातांसाठी स्तनपान कक्षाचीही स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अपंग, वृद्धांसाठी सरकता जिना
अपंग आणि वृद्धांना मंदिरात जाण्यासाठी रोपवेचा प्रकल्प आखण्यात आला होता. मात्र, टेकडीची उंची केवळ 95 मीटर असल्याने दोन स्टेशन निर्मितीत अडचणी निर्माण होत असल्याने तो आराखडा रद्द करून तेथे सरकता जिना करण्यात येणार असल्याचे अनगळ यांनी सांगितले. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू करणार आहे. महापालिकेने आराखड्याला मान्यता दिली होती. काही बदल करून पुनर्मान्यतेला देण्यात आला आहे. मान्यता मिळताच नवरात्रीनंतर काम सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)