चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कारकून होण्याची संधी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आता कारकून होण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेच्या विविध विभागासाठी लिपिक कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असल्याने कारकून पदोन्नतीची पदे भरण्यासाठी चतुर्थ श्रेणीतील पात्र कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण, प्रति मिनिट तीस शब्द मराठी, तर चाळीस शब्द इंग्रजी टंकलेखन शासकीय परीक्षा उत्तीर्ण आणि महापालिकेच्या सेवेत क्‍लास फोरमध्ये किमान तीन वर्षे नियमित सेवा झालेली असावी, अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी टंकलेखन प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी, तसेच या प्रमाणपत्राची तपासणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पदासाठी पाठविण्यात येणाऱ्या अर्जासोबत जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, महापालिका सेवेतील नेमणूक आणि नियमित झालेल्या आदेशाची प्रत विभाग प्रमुखांच्या शिफारशीने प्रशासन विभागाकडे 15 जानेवारी 2019 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आहे. मात्र, क्‍लास फोर कर्मचाऱ्यांना कारकून पदावर बढती मिळल्यानंतर उमेदवाराचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष होणार आहे, तर चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांची कारकून पदावर नियुक्ती झाल्यानंतर लाड कमिटीनुसार वारस नेमणूक आणि अन्य फायदे संबंधित कारकूनास मिळणार नाहीत. या संबंधीचे परिपत्रक आणि त्यासाबत अर्जाचा नमुना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)