चक्क ! ‘तो’ 15 वर्षांनी कोमातून आला बाहेर

संग्रहित छायाचित्र

गंभीर अपघातामुळे अनेकदा काही मोठ्या प्रकारची इजा होते; तर काही वेळा माणूस कोमात जातो. अशा वेळी या व्यक्‍तीचे नातेवाईक आशा सोडून देतात. पण नियती आपले काम करीत असते. अशा वेळी जे घडते ते अनेकवेळा तर्काच्या पलिकडचेच असते. फ्रान्समधील एका माणसाबाबतही अशीच घटना घडली. हा 35 वर्षांचा माणूस तब्बल 15 वर्षांनंतर कोमामधून बाहेर आला. एका मोटार अपघातात तो “व्हेजिटेटीव्ह स्टेज’ (कोमा) मध्ये गेला होता. या अवस्थेत माणूस जिवंत तर असतो, पण शरीर आणि मेंदू काम करीत नाही. अशा स्थितीतून तो बाहेर येणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही!

अशा व्यक्तीला औषधांच्या आधाराने जिवंत ठेवले जाते. दीर्घकाळाने अशी व्यक्ती कोमामधून बाहेर येणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. या माणसाला वेगस नर्व्ह स्टीमुलेशन (व्हीएनएस) थेरपीच्या सहाय्याने चेतनेच्या सजग स्थितीत आणण्यात यश आले. ही व्हीएनएस थेरपी सध्या अपस्माराचे झटके किंवा डिप्रेशनसारख्या समस्यांमध्ये वापरली जाते. आता या घटनेमुळे ही उपचार पध्दती व्हेजिटेटीव्ह स्टेजमधील व्यक्तीला शुध्दीवर आणण्यासाठीही परिणामकारक असल्याचे सिध्द झाले आहे. ही स्थिती बारा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहते व नंतर ती कायमची बनते या प्रचलित धारणेलाही आता छेद मिळाला. या माणसाने आता सामान्य सुचनांवर प्रतिसाद देण्यास सुरूवात केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)