मांडवगण फराटा -येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चकोरवस्ती येथील शाळेत 33 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
या वक्षारोपणप्रसंगी मांडवगण फराटा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पाटील फराटे, पंडीत फराटे सदस्य ग्रामपंचायत मांडवगण फराटा, अर्चना फराटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक संतोष जगताप, शिक्षक प्रशांत भापकर, उल्हास फराटे, पुंडलिक फराटे, संचिता फराटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी पंडीत फराटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शासनाच्या वृक्षलागवडीच्या योजनेला आम्ही आमच्या घरापासून सूरवात केली असून आम्ही ग्रामस्थ शेतातील बांधावर उत्स्फूर्तपणे पर्यावरणाच्या संतूलनाला हातभार लावणार आहोत. सद्यस्थितीत पर्जन्याचे प्रमाण हे अत्यल्प होत आहे. त्याला वृक्षतोड कारणीभूत आहे. तेव्हा वृक्षतोड न करता झाडे लावण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना फराटे यांनी केले. मुख्याध्यापक संतोष जगताप म्हणाले, विद्यार्थी शाळेत झाड लावून वाढदिवस साजरा करणार असल्याचे सांगितले. प्रशांत भापकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.