चकलांबा येथील तरुणांचे साहस;पेटत्या ट्रकवर झेप घेत मजुरांचे वाचवले प्राण

बीड : ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर घराकडे परतत आहेत. अशाच ऊस तोड मजुरांना आणि जनावरांना घेऊन जाणारा एक ट्रक काल मध्यरात्री गावाकडे परतत असताना चकलांबा येथे अचानक पेटला. ट्रक पेटताच चालकाने उडी मारून पळ काढला, मात्र मजुरांच्या आराडाओरड्याने धावून आलेल्या तरुणांनी आगीत झेप घेत ट्रकमधील मजुरांना आणि जनावरांना बाहेर काढलं. ट्रकचा स्फोट होऊ नये म्हणून एका तरुणानं हा ट्रक शेजारीच असलेल्या देवतळे तलावात घुसवला आणि साऱ्यांचे प्राण वाचवले.

बीड जिल्ह्यातील चकलांबा जवळ असणाऱ्या कासारवाडी येथील 20 मजुरांना व जनावरांना घेऊन परतणाऱ्या ट्रकने मध्य रात्री दीडच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालक ट्रक सोडून पळाला, घाबरलेल्या मजुरांनी आरडाओरड सुरू केली. या गोंधळाने चकलांबा येथील तरुण घटना स्थळाकडे धावले काही तरुणांनी जीवाची बाजी लावून पेटलेल्या ट्रक वर चढत ट्रक मध्ये असलेल्या ऊस तोड मजुरांची आणि जनावरांची सुटका केली. यात काही महिला आणि बालकांचा समावेश होता, एवढेच नव्हे तर जनावरंही बाहेर काढली. संपूर्ण पेटलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीचा केव्हाही स्फोट होऊ शकेल या भीतीनं शिंदे नावाच्या एका तरुणानं ट्रक चालू केला आणि जवळच असलेल्या तळ्याच्या पाण्यात घुसवला, ट्रक पेटलेला असतानाही काही तरुणांनी महिला, पुरुष व जनावरे बाहेर काढली व ट्रक पाण्यात घुसवल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला.

-Ads-

ग्रामस्थाच्या सतर्कतेने आणि तरुणांच्या धाडसाने तब्बल 20ऊस तोड मजुरांचे व जनावरांचे प्राण वाचले, ही घटना मध्यरात्री दीड वाजता चकलांबा शिवारात घडली. मदतीसाठी धावून येणाऱ्या ग्रामस्थाचे जिल्हा भरातून आभार मानले जात आहेत.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)