चकमकीत जखमी झालेला दहशतवादी आढळला रूग्णालयात

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीत जखमी झालेला एक दहशतवादी पोलिसांना रूग्णालयात उपचार घेताना सापडला. असिफ अश्रफ मलिक असे जखमी दहशतवाद्याचे नाव आहे. तो हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा सदस्य आहे.
गुरूवारी रात्री शोपियॉं जिल्ह्यात कारमधून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्याला लष्कराच्या पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली.

त्यानंतर चकमकस्थळावरून वेगाने निघून जाण्याच्या प्रयत्नात दहशतवाद्यांची कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. त्यानंतरही तिथून निसटण्यात दहशतवादी यशस्वी ठरले. दहशतवाद्यांपैकी मलिक 50 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून उपचारासाठी श्रीनगरमधील रूग्णालयात पोहचला आणि पोलिसांच्या जाळ्यात आला. कालच्या चकमकीत तो जखमी झाल्याचे स्पष्ट झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)