चकण्याला कबुतराची आठ अंडी खाऊन आत्महत्या

दारूच्या नशेत आठव्या मजल्यावरुन मारली उडी

पुणे,दि.19- मद्य पिताना चकण्यासाठी काहिच सापडले नाही म्हणून गॅलरीतील कबुतराच्या आठ अंड्यांचे आम्लेट करुन खाल्ले. मात्र कबुतराची अंडी आणी नशा याचा विपरीत परिणाम होऊन त्याने नशेतच थेट आठव्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना विमाननगर येथे काल रात्री घडली.
आर्नव मुखोपाद्याय असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो व्होडाफोन कंपनीत बॅक ऑफिसला एक्‍झिक्‍युटीव्ह म्हणून काम करतो. घटना घडली तेव्हा त्याची पत्नी घरातच होती. त्याच्या पडण्याचा आवाज आल्यावर सोसायटीतील नागरिकांनी धाव घेतली. तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर त्याच्या पत्नीनेही घटनास्थळी धाव घेतली.
यासंदर्भात माहिती देताना विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले, आर्नव हा व्होडाफोन कंपनीत काम करतो.  रात्री तो घरातच मद्य पित होता. मात्र सोबत चकण्याला काहीच नसल्याने त्याने गॅलरीतील कबुतराने घातलेली आठ अंडी काढली. या सर्व अंड्यांचे त्याने आम्लेट करुन खाल्ले. यानंतर पुन्हा बिअर पिली. या नशेमध्ये तो रात्री घरात गोल गोल फिरत होता. दरम्यान नशेतच त्याने गॅलरीचा दरवाजा उघडून आठव्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)