चंद्राबाबू नायडू यांच्याविरुध्द्व अटक वारंट जारी 

नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील एका न्यायालयाने अटक वारंट जारी केले आहे. या अटक वारंटमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत अन्य १५ जणांची नावेही सामील आहेत.

२०१० मध्ये महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरील गोदावरी नदीच्या बाभळी प्रकल्पावर वाद उभा राहिला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी प्रकल्पाविरोधात ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी नांदेडच्या धर्मा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, कामात अडथळा आणणे, इजा पोचविणे, धमकावणे आदी कलमे एन. चंद्राबाबू नायडू व अन्य १५ जणांवर लावण्यात आली आहे.  याप्रकरणावर सुनावणी करताना महाराष्ट्रातील धर्माबाद (जि.नांदेड) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. गजभिये यांनी नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

काय आहे बाभळी वाद – 

१९९५ मध्ये बाभळी प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर २००४ मध्ये प्रत्यक्षात काम  सुरु झाले. परंतु या प्रकल्पामुळे अनेक नागरिक विस्थापित होणार असल्याचा दावा करत चंद्राबाबू नायडूंसह १५ जणांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी त्यांना अटक करून पुण्यातील जेलमध्येही ठेवण्यात आले होते. मात्र नंतर आंदोलंकर्त्यांना सोडून देण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)