चंद्राबाबू थोडक्‍यात बचावले, मंडप कोसळल्याने 4 ठार तर 30 जखमी

आंध्रप्रदेश – राज्यातील कडपा जिल्ह्यात रामनवमी निमित्त काढलेल्या मोठ्या मिरवणुकीदरम्यान एक मांडव कोसळला. या दुर्घटनेत 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे थोडक्‍यात बचावले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, कडपा जिल्ह्यातील वोंटिमिटा येथील कोडनड्रमा स्वामी मंदिरात रामनवमीनिमित्त कार्यक्रम सुरू होता. या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांसोबत येथे हजेरी लावली होती. अचानक सुरु झालेला सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. त्यानंतर काही क्षणांत येथे मोठा गोंधळ निर्माण झाला. यामुळे मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. प्रशासनाने घटनास्थळी बचाव कार्य सुरु केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)