चंद्राबाबू तुमचा निर्णय दुर्दैवी-अमित शाह

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून विभक्त झालेल्या तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना तब्बल 8 दिवसांनंतर पत्र लिहिले आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा तुमचा निर्णय एकतर्फी आणि दुर्दैवी असल्याचे शाह यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

चंद्राबाबू यांचा निर्णय पूर्णतः राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असे अमित शाह यांनी पत्रात म्हटले आहे. यावेळी, आंध्र प्रदेश राज्याच्या विकासाचा उल्लेख करत शाह यांनी टीडीपीवर गंभीर आरोप केले आहेत. टीडीपीला आंध्र प्रदेशच्या विकासाची काळजी नसल्यानं त्यांनी एनडीएपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची टीका शाह यांनी पत्रातून केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)