चंद्राबाबूंचाही भाजपला वेगळा विचार करण्याचा इशारा

हैदराबाद – भारतीय जनता पक्षाला आमच्या बरोबर काम करण्यात स्वारस्य नसेल तर आम्हीही आमच्या वेगळा विचार करण्यास तयार आहोत असे तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. तेलंगणातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने तेलगू देसम पक्षाच्या सरकारवर टीका केली जात आहे त्यामुळे सध्या चंद्राबाबू चांगलेच संतप्त झालेले आहेत.

आज पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की, आम्ही अजूनही युती धर्माचे पालन करीत आहोत पण राज्यातील भाजपचे नेते ताळतंत्र सोडून सरकारच्या कामकाजावरच टीका करीत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना वेळीच आवरले पाहिजे, अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करण्यास वेळ लागणार नाहीं असे ते म्हणाले.

युतीधर्मामुळे आम्ही गप्प आहोत अन्यथा त्यांना कधीही नमस्कार करून रामराम करण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तेलंगणात भाजप सरकारचा घटक पक्ष आहे. आणि तेलगु देसम हा पक्ष भाजप प्रणित एनडीएशी संलग्न आहे पण भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सध्या वायएसआर कॉंग्रेसशी सूत जमवण्याचे प्रयत्न सुरू केल्याने तेलगु देसम पक्षात अस्वस्थता आहे. भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच चंद्राबाबूंनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)