चंद्रशेखर राव यांच्या सरकारने तेलंगणात अपेक्षा भंग केला : राहुल गांधी

सोनिया गांधी व राहुल यांची टीका 

हैदराबाद: तेलंगणा या नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील जनतेच्या मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण त्यांच्या सरकारने अपेक्षा भंग केला असून त्यांनी केवळ या राज्यात आपल्या परिवाराचेच हित पाहिले अशी टीका युपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ते आज येथील एका संयुक्त प्रचार सभेत बोलत होते. या सभेत कॉंग्रेसने विरोधी पक्षांच्या ऐक्‍याचेही दर्शन घडवले. या सभेला तेलगु देसम, तेलंगणा जन समिती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते उपस्थित होते. हैदराबाद शहराच्या बाह्य भागात असलेल्या मेदाचल मध्ये ही रॅली झाली.

-Ads-

तेलंगणाची स्थापना युपीए सरकारच्या काळात झाली आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांची या राज्यात झालेली ही पहिलीच जाहीर सभा होती. आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा या स्वतंत्र राज्याची मागणी पुर्ण करण्यात कॉंग्रेसला ज्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागला त्याची आठवण सोनियांनी यावेळी करून दिली. त्या म्हणाल्या की या निर्णयाचा आम्हाला मोठा राजकीय फटका बसणार आहे याची कल्पना येऊनही आम्ही तेलंगणातील जनतेच्या मागणीच्या बरोबर राहिलो आणि त्यांचे स्वतंत्र राज्याचे स्वप्न साकार केले. चंद्रशेखर राव यांनी मात्र राज्यातील जनतेची निराशा केली. राज्यातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, अन्य मागास, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी पाच वर्षात काय केले आणि त्यांचे कोणते आश्‍वासन त्यांनी पुर्ण केले असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.

या स्वतंत्र राज्याची स्थापना झाल्यानंतर ज्या तऱ्हेने येथे विकास व्हायला हवा होता तो झाला नाहीं असा आरोपही त्यांनी केला. युपीए सरकारने केलेला रोजगार हमीचा कायदा आणि जमीन सुधारणांचा कायदा इत्यादी योजनांचा या राज्यातील जनतेला कोणताच लाभ टीआरएस पक्षाच्या सरकारने मिळू दिला नाही असेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनीही मुख्‌यमंत्री राव यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की गेली पाच वर्षे या राज्यात केवळ एकाच व्यक्तीची मनमानी सुरू होती व त्यांनी आपल्या कुटुंबाच्या हिताखेरीज अन्य कोणाच्याही हिताचा विचार केला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)