चंद्रबाबू नायडूंची टीका खोटी आणि बिनबुडाची

अमित शाह यांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली – तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपावर केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, अशा शब्दामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नायडू यांची ही कृती राजकीय हेतूने प्रेरित होती. यामागे विकासाचा विचार नव्हता. म्हणूनच केंद्र सरकारवर खोटी आणि बिनबुडाची टीका करण्यात आली होते होती, असे प्रत्युत्तर शाह यांनी दिले. तेलगू देसम पक्ष केंद्र सरकारमधून बाहेर पडण्यावर शाह यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली.

नायडू यांना पाठवलेल्या 9 पानी पत्रामध्ये अमित शाह यांनी आंध्रात सुरू केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती देऊन आंध्रप्रदेश पुनर्निर्माण कायद्यांतर्गत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केंद्र सरकारने केल्याचे शाह यांनी म्हटले आहे. ही कामे केल्यावरही भाजपाच्या वचनबद्धतेबाबत प्रश्‍नचिन्ह कसे उपस्थित केले जाऊ शकते, असा प्रश्‍नही शाह यांनी विचारला आहे. आंध्र प्रदेश सरकारनेच केंद्राच्या निधीच्या विनियोगाचे सविस्तर विवरण दिलेले नाही. असे कोणतेही विवरण देण्यास राज्य सरकार बांधील नसल्याचे नायडू यांचे उडवाउडवीचे उत्तर म्हणजे प्रशासकीय त्रुटीचे निदर्शक असल्याचेही शाह यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

आंध्राचे विभाजन झाले तेंव्हा 2014 साली राज्य आणि केंद्रातही कॉंग्रेसचे राज्य होते. पाच वर्षे महसूली तूट होणारे आंध्र प्रदेश हे एकमेव राज्य आहे आणि गेल्या पाच वर्षात “एनडीए’सरकारने आंध्राला दुपटीपेक्षा जास्त सहाय्य दिले आहे. आंध्राच्या नवीन राजधानीसाठी केंद्राकडून देण्यात आलेल्या विकास निधीचा उल्लेखही शाह यांनी पत्रात केला आहे.
आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देता येणार नाही, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आल्यावर तेलगू देसमने भाजपबरोबरची चार वर्षांची साथ सोडली आणि लोकसभेमध्ये सरकारविरोधात अविश्‍वासाचा ठरावही दाखल केला आहे. आंध्रातील राजकीय पक्ष चर्चेला प्राधान्य न देता केवळ लोकभावना भडकावण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)