चंद्रपूर @ 45.4 अंश, पुणे चाळिशीजवळ

पुणे – अवकाळी पावसानंतर आता पुन्हा राज्यात उकाडा वाढू लागला आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान हे चाळीस अंशाच्या जवळपास पोहचले आहे. राज्यात गुरुवारी सर्वाधिक तापमान हे चंद्रपूर येथे 45.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.गेले तीन ते चार दिवसांपासून राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात घट तसेच गारवाही निर्माण झाला होता. पण, बुधवारपासून तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. विदर्भातसुद्धा अनेक भागातील तापमान हे 40 अंशांपुढे नोंदले गेले.

पुणे शहरातही आज तापमान हे 38.6 अंश नोंदविले गेले. पुण्यात आगामी काळात हे तापमान 40 अंशांपर्यत पोहचण्याची शक्‍यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

-Ads-

राज्यातील विविध शहरांतील तापमान :
नागपूर- 42.2, सातारा-38.6, सोलापूर-42.0, परभणी-42.0, नाशिक-41.2, अकोला-44.2, कोल्हापूर,36.3 बुलढाणा 40.2,परभणी 43.6


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)