चंद्रपुर येथे रेल्वेच्या धडकेत दोन वाघांचा मृत्यू

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघिणिच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे आज समोर आले आहे. ही दुर्घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर आतापर्यंत वाघ, बिबटे यांसारख्या अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तिसरा मृत बछडा आढळला 
चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चांदा फोर्ट रेल्वे मार्गावर तिसरा वाघाचा मृत बछडा आढळला आहे. यामुळे जिल्हासह राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते या घटनेची चौकशी करत आहेत. दरम्यान, एकाच घटनेत 3 वाघाच्या बछड्यांच्या मृत्यूच्या घटनेने वन्यजीवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)