चंद्रकांत पाटील यांचा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या बैठकींना केवळ भाजपाप्रेरित व्यक्तींना बोलावत असून त्याद्वारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, असा आरोप सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घेण्यात आली. या वेळी आरक्षणाबाबत सरकार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याने त्यासंबंधी शासनाने जारी केलेले सात अद्यादेश फाडून निषेध करण्यात आला. अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारशी चर्चा न करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. पाटील यांची आरक्षण अभ्यास उपसमितीच्या अध्यक्षपदावरून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)