चंद्रकांत पाटलांचा घुमजाव ; माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला

मुंबई: महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. “डॉल्बीमुक्त कोल्हापूर हा विषय होता. यावरून डॉल्बीला विरोध हा राजकीय अजेंडा नसून सामाजिक आहे, असे मी सांगितले. डॉल्बीच्या विषयावरून मला निवडणूक लढवायची नाही, असेही म्हंटले होते. परंतु, पत्रकारांनी विपर्यास करत मला निवडणूक लढवायची नाही याचीच बातमी केली”, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

आगामी निवडणूका तोंडावर असतानाच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दल मोठे वक्तव्य केले होते. यापुढे कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केल्यानंतर राजकीय गोटात चर्चेला उधाण आले होते.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीन ‘गणराया अॅवॉर्ड 2017’ चा पुरस्कार वितरण सोहळा आज कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)