चंद्रकांत पाटलांचा ऋुतूराज पाटीलला मदतीचा हात

कोल्हापूर – शाहुवाडी तालुक्यातील  नांदगांव येथील 14 वर्षीय ऋुतूराज पाटील याच्या डोळ्यातून सातत्याने पाणी येत होते. डोळा निकामी होण्याची शक्यता असल्याने त्यावर ताबडतोब शस्त्रक्रीया करणे आवश्यक होते. परंतु हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रीयेचा खर्च परवडणारा नव्हता. अशा अडचणीच्या काळात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे ऋुतूराज पाटील याच्या डोळयावर येथील विन्स हॉस्पीटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. कित्तेक‍ दिवसांच्या या त्रासातून मुक्तता मिळाल्याचे समाधान ऋुतूराज पाटील व त्याच्या आई-वडीलांच्या चेहऱ्यावर दिसू लागले.

ऋुतूराज पाटील याला जन्मापासूनच डोळयातून पाणी येण्याचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी मुंबई येथील एका रूग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र पुन्हा त्याला त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर पुन्हा तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र वडील युवराज पाटील हे गरीब शेतकरी असल्याने त्यांना हा खर्च करणे शक्य नव्हते.

गावातील काही युवकांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कोल्हापूरचे समन्वयक विजय जाधव यांना दिली. कोणताही वेळ न दवडता विजय जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबतची कल्पना दिली. पालकमंत्री यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ऋुतूराज यास तात्काळ डॉ.प्रभू यांच्या विन्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याची सूचना करुन शस्त्रक्रीयेचा सर्व खर्च लोकसहभागातून करण्याची जबाबदारी स्विकारली.

त्यानुसार ऋुतूराज याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्कीट हाऊस येथे ऋुतूराज पाटील याची  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थापूर्वक विचारपूस करुन धीर दिला. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कोल्हापूरचे समन्वयक विजय जाधव, ऋुतूराजचे वडील युवराज पाटील, आत्या शारदा भाऊसाहेब घाटबांदे, पणनचे विशेष लेखा परिक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)