सातारा: गेली 190 वर्षे शुध्दता, व्यवहारातील पारदर्शकता, विश्‍वास या गुणवैशिष्ठांची अविरत परंपरा असलेल्या चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि. या सुवर्णपेढी तर्फे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री परिणिती चोप्रा हिला ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून साईन करण्यात आले आहे. सुवर्णपेढीचे संचालक सिध्दार्थ शहा यांनी सांगितले की, आमच्या असंख्य ग्राहकांना सतत काहितरी नविन देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

पारंपारिक दागिन्यांना आधुनिकतेची जोड देवून त्यांना ग्राहकाभिमुख करण्यास आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलोआहोत. नविन ब्रॅन्ड अॅम्बेसेडरच्या माध्यमातून हिच ओळख यापुढेही कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरआणि आगामी लग्नसराईकरिता फ्लोरिटा वेडींग कलेक्‍शन या सोने आणि हिऱ्यांच्या अनोख्या दागिन्यांची श्रेणी घेवून आमची सर्व शोरूम्स्‌ सज्ज आहेत असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)