चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली: “आयसीआयसीआय’ बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समुहाचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयने फसवणूक आणि कर्ज मंजूरी प्रकरणातील अनियमिततांबाबत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गुरुवारी मुंबई आणि औरंगाबादेत व्हिडीओकॉन समुहाशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे घातले. याशिवाय दीपक कोचर यांच्याद्वारे संचलित नूपॉवर रिन्यूएबल प्रायव्हेट लिमिटेड अणि सुप्रिम एनर्जी या कंपन्यांच्या कार्यालयांचीही झडती घेतली.
चंदा कोचर यांनी कारस्थान करून “आयसीआयसीआय’ बॅंकेला फसवण्यासाठी खासगी कंपन्यांना कर्जवाटप केले असल्याचा आरोप आहे, असे सीबीआयच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

सीबीआयने दाखल करून घेतलेल्या “एफआयआर’मध्ये चंदा कोचर यांच्या व्यतिरिक्‍त त्यांचे पती दीपक आणि धूत यांच्याशिवाय नुपॉवर रिन्यूएबल्स, सुप्रिम एनर्जी, व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड आणि व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. व्हिडीओकॉन समुहाला “आयसीआयसीआय’ बॅंकेकडून 3,250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी नुपॉवर कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली, असेही सीबीआयच्या प्रवक्‍त्याने सांगितले. सीबीआयने 10 महिन्यांपूर्वी धूत, दीपक कोचर आणि अज्ञात व्यक्‍तींविरोधात प्राथमिक चौकशीचे प्रकरण दाखल केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)