चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची आयसीआयसीआय चौकशी करणार

नवी दिल्ली : व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या विस्तारित कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल, असे आयसीआयसीआय बँकेने बुधवारी जाहीर केले आहे. तसेच त्या चौकशी समितीचे अध्यक्ष कोण असतील, याचा निर्णय ऑडिट कमिटी घेणार आहे.

व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला २०१२ मध्ये बँकेने ३, २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची ६४ कोटी रुपयांची गुंतणूक आहे. पतीशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर होत आहे. या प्रकरणात सीबीआयचा तपास सुरु असून सेबीने नुकतीच नोटीस बजावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयसीआयसीआय बँकेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार चंदा कोचर यांची चौकशी केली जाणार आहे. अज्ञात ‘व्हिसल ब्लोअर’ने केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी केली जाईल. चौकशी समितीचे अध्यक्ष, समितीचे अधिकार आणि चौकशीचा कालावधी याबाबतचे सर्व निर्णय ऑडिट कमिटी घेईल, असे बँकेने स्पष्ट केले. चौकशीत आवश्यकता वाटल्यास फॉरेन्सिक मदत तसेच ईमेल देखील तपासले जातील आणि संबंधित व्यक्तींचा जबाब देखील घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)