चंदन चोरांची टोळी जेरबंद

62 किलो चंदन जप्त

सातारा- चंदनाची झाडे रात्रीत चोरुन नेणाऱ्या फलटण तालुक्‍यातील सात जणांच्या सराईत टोळीला पुसेगावमध्ये जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले.नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 39), यशवंत गुलाब जाधव (वय 50), ज्ञानदेव गुलाबराव जाधव (वय 60), आनंदा बचाराम जाधव (वय 40), तुकाराम शंकर बनसोडे (वय 50), कुमार शिवाजी जाधव (वय 33) व नवनाथ पोपट जाधव (वय 31, सर्व रा. तातवडे, ता. फलटण) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी पाच दिवसांपूर्वी चंदनाची 12 झाडे तोडून नेली होती. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. चोरटे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहचल्याने या गुन्ह्याचा तपास हे पोलिसांपुढे आव्हान होते. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्‌माकर घनवट यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. पुसेगाव येथे मोटारसायकलवरील सहा-सात लोकांकडे चोरीचे चंदन असून विक्री करण्याच्या उद्देशाने ते गावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पुसेगावच्या शिवाजी चौकात, रस्त्याकडेला तीन मोटारसायकलींवर प्लास्टिकची ठिकी आढळली. जवळच सात लोक होते. पोलिस पथकाने चौकशी करून सर्वांना ताब्यात घेतले. सखोली चौकशी केल्यानंतर संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली. जिल्हाधिकारी निवासस्थानाबरोबरच पुसेगाव येथील धबधबी नावाच्या शिवारातील चंदनाची झाडेही तोडल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्याकडून तीन मोटारसायकली, ऍटोमॅटीक कटर व 62 किलो चंदन असा सुमारे एक लाख 97 हजार रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. ताब्यातील चोरटे सराईत असले तरी पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. ओढ्या-ओढ्याने फिरुन चंदनाच्या झाडांचा शोध घ्यायचा.

झाडं हेरून ठेवल्यानंतर डाव साधायचा, अशी त्यांची पद्धत आहे. वृत्तपत्रात बातमी वाचल्यानंतर त्यांना आपण जिल्हाधिकारी निवासाच्या आवारात चोरी केल्याचे समजले. तोपर्यंत त्यांना माहिती नव्हते. महिन्याभरापूर्वी रात्रीच्या वेळी यातील एकाने जिल्हाधिकारी निवासाच्या परिसराची टेहळणी केली होती. त्यानंतर बॅटरी कटरने अवघ्या दोन मिनिटांत चंदनाची झाडे गायब केली. अशी माहिती संशयितांकडून पुढे आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पुसेगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. विश्‍वजीत घोडके करत आहेत.

फोटो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)