चंदनापुरीत सात ठिकाणी घरफोड्या

चोरट्यांचा धुमाकूळ : सात तोळे सोने, सहा हजार रुपयांचा ऐवज लंपास
संगमनेर – तालुक्‍यातील चंदनापुरी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत सात ठिकाणी घरफोडया करत सात तोळे सोन्याचे दागिने व रोकड चोरुन पोबारा केला. हा प्रकार शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंदनापुरी याठिकाणी जयश्री किशोर बोऱ्हाडे ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. गुरुवारी संध्याकाळी बोऱ्हाडे या नेहमीप्रमाणे जेवण करून झोपल्या होत्या. चोरट्यांनी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान जिन्याजवळील खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व कपाटामध्ये असणारे सात तोळे सोन्याचे दागिने, रोकड सहा हजार असा ऐवज चोरला. मग या चोरट्यांनी गावातीलच सत्यभामा पर्वत राहाणे, अनिता विशाल राहाणे, विकास रंगनाथ पावसे, यशोदाबाई रावसाहेब राहाणे, अनिल संपत कढणे, सुनील रामभाऊ कढणे यांच्याही घरांमध्ये व दुकानांमध्ये प्रवेश केला आणि उचकापाचक करत काही ऐवजही चोरुन नेला आहे.
नेमका किती ऐवज गेला आहे ते मात्र पोलिसांना समजू शकले नाही. शुक्रवारी सकाळी गावामध्ये चोऱ्या झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती चंदनापुरी गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव राहाणे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दूरध्वनीद्वारे सांगितली. माहिती समजताच सकाळी आठ वाजता पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार एम. बी. खान, पोलीस नाईक अशोक धनवट, यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ज्या ज्या ठिकाणी चोजया झाल्या. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात हेही घटनास्थळी पोहोचले. ज्या ज्या ठिकाणी घरफोड्या झाल्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी माहिती घेतली. साडेअकराच्या सुमारास नगर येथून श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याप्रकरणी जयश्री बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एम. बी. खान करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)