चंदनवाडीमध्ये उत्स्फूर्त बंद

चंदनवाडी- चंदनवाडी (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि. 9) कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाज, ठोक मोर्चाद्वारे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला पाठिंबा देत चंदनवाडी येथे दिवसभर उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्व व्यवहार दिवसभर बंद होते. यावेळी तरुणांनी बाईक रॅली काढली, तसेच या युवकांनी काही काळ रस्ता रोको केला आणि “एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. दरम्यान, शासनाने दिलेल्या वेळेत प्रश्न न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे मोर्चाद्वारे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)