चंदगडमध्ये अपघातात एक विद्यार्थी ठार

कोल्हापूर- बेळगाव-वेंगुर्ला रस्‍त्यावर झालेल्या कार अपघातात दहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. तालुक्यातील नागणवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. रोहन शिवाजी गावडे (वय १६) रा. शिरगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर चालक अजय यशवंत कुंदेकर(वय १६) हा गंभीर जखमी झाला आहे. अजय कुंदेकर हा वडिलांची अल्टो कार घेऊन कोरज येथे मामाच्या गावी मित्र रोहन याला सोबत घेऊन गेला होता.

परत येत असताना नागणवाडी नजीक अजय याचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी गाडी रस्त्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला जोरात धडकली. त्यानंतर शेतात कोसळली. यावेळी गाडीतील रोहन गावडे हा जागीच ठार झाला. तर चालक अजय गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत चंदगड पोलीस अधिक तपस करत आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)