चंडीगडला होणार ई-लिलाव

चंडीगडमध्ये विविध भागांत रिकाम्या असलेल्या रहिवासी आणि व्यापारी मालमत्तांचा लिलाव ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा लिलाव तिथे 10 वर्षांनंतर होत आहे. या लिलावात 43 रहिवासी आणि 27 व्यापारी मालमत्तांचा समावेश करण्यात आला असून, लिलाव येत्या जानेवारीत होणार आहे. या मालमत्तांची “रिझर्व्ह प्राइस’ एका यादीद्वारे जाहीर करण्यात आली आहे. जानेवारीच्या 5 ते 10 तारखेदरम्यान हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होईल, असे सांगितले जाते.

रहिवासी मालमत्तांसाठी किमान “रिझर्व्ह प्राइस’ 89.26 लाख रुपये ठेवण्यात आली आहे तर कमाल “रिझर्व्ह प्राइस’ 7.53 कोटी रुपये इतकी आहे. व्यापारी मालमत्तांसाठी किमान 33 लाख रुपये तर कमाल 13.87 कोटी रुपये इतकी “रिझर्व्ह प्राइस’ ठेवण्यात आली आहे. यापूर्वी चंडीगडमध्ये 2009 या वर्षी 45 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. त्यातून प्रशासनाला 100 कोटींचा महसूल मिळाला होता. अर्थात, या लिलावानंतर रिअल इस्टेट बाजारपेठेत सातत्याने घसरण दिसत असून, चंडीगडमध्ये रहिवासी किंवा व्यापारी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यात लोकांना फारशी रुची नसल्याचे दिसून आले आहे. व्यापारी मालमत्तांमधील बहुतांश मालमत्ता सेक्‍टर 36, 42, 44, 39 आणि 40 या भागांतील असून, जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेल्या रिझर्व्ह प्राइसनुसार लिलाव करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– कीर्ती कदम


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)