घोषवरील बंदी उठली, राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत होणार सहभागी

सोनिपत: माजी राष्ट्रीय टेबल टेनिस विजेता सौम्यजीत घोष यांच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय)ने घेतला आहे. जुन्या मैत्रिणीच्या बलात्कार प्रकरणात त्याचे नाव समोर आल्याने टीटीएफआयने त्याच्यावर मार्चमध्ये बंदी घातली होती.

सोनिपत येथे सुरु असलेल्या 11 स्पोर्टस 80 व्या ज्युनिअर आणि युवा राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत टीटीएफआयच्या कार्यकारी मंडळासमोर घोषच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली गेली. त्यानंतर ताबडतोब त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला गेला निया त्याला सर्वप्रकारच्या राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे तो पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय अजिक्‍यपद स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)