घोलप महाविद्यालयात प्लेसमेंट असिस्टंस कार्यक्रम

सांगवी – शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी-व्यवसाय क्षेत्रात चांगले करिअर करता यावे, यासाठी बाबुरावजी घोलप महाविद्यालयात प्लेसमेंट असिस्टंटसचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत संगणकशास्र विभागाने 33 दिवसांचा स्कील आणि इम्प्लोयबिलिटी इनहान्समेंट कार्यक्रम आयोजित केला होता.

हा कार्यक्रम नॅसकॉम सीसीकोड उन्नती, प्राइम्ड एज्युकेशन सोल्युशन यांच्यामार्फत घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी 60 विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमात नॅसकॉम प्लेसमेंट हेड रोहित श्रीवास्तव व नेहा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

-Ads-

विभाग प्रमुख सीमा चौहान यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी महाजन यांनी केले व आभार प्रदर्शन कुमुद गुजर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)