घोलपवाडी येथे एकाची आत्महत्या

भवानीनगर- घोलपवाडी (ता. इंदापूर) येथील केशव ज्ञानदेव पवार यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत त्याचा भाचा परशुराम शिवाजी सावंत यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार केशव पवार (41) यांनी आज (दि. 13) सकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास राहत्या घरी घराच्या छताच्या लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक फौजदार प्रभाकर बनकर, पोलीस हवालदार वसंत वाघोले, पोलीस नाईक रमेश शिंदे यांच्या मदतीने पुढील तपास पोलीस हवालदार रोहिदास चौधर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)