घोरावडेश्‍वर डोंगर परिसरात वृक्ष प्रेमींकडून वृक्षांची लागवड

देहुरोड – पुणे-मुंबई महामार्गावरील देहुरोड लगत असलेल्या शेलारवाडी येथील घोराडेश्‍वर डोंगर परिसरात अडीच हजार वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्या हस्ते वृक्षरोपण करून उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.

रघुवीर शेलार स्नेह ग्रुप, विश्‍व हिंदू परिषद, वनविभाग, बजरंग दल आणि स्पर्धा करिअर अकॅडमी यांच्या वतीने अडीच हजार वृक्ष लागवड करण्याची संकल्पना करण्यात येऊन या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. घोरावडेश्‍वर डोंगरावरील श्री घोरावडेश्‍वर (शिव मंदिर) मंदिरामुळे मोठ्या संख्येने भाविक श्रावण महिन्यात, महाशिवरात्री व प्रति सोमवारी दर्शनार्थ येत असतात. घोरावडेश्‍वर डोंगर पायथ्याला असणारे अमरजाई माता मंदिराच्या दर्शनार्थ भाविक तसेच पर्यटक फिरण्यास पर्यटक येत असतात. याच परिसरात वृक्षलागवड करण्याची संकल्पना राबवित जनजागृती करण्याच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेतले.

-Ads-

वृक्षलागवडीत आंबा, वड, बांबू, शिवरी, लिंबू आदी वृक्षांचा समावेश आहे. नगरसेवक रघुवीर शेलार, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, वनविभागाचे सुनील भुजबळ, बजरंग दलाचे सुनील अग्रवाल, अविनाश शेलार, श्रीकृष्ण भेगडे, दत्तात्रय माळी, अजित शेलार, सचिन शेलार, बाळासाहेब शेलार संदेश भेगडे ,मुकेश पाठक ,योगेश शेलार ,प्रतीक जाधव ,दिनेश बालघरे, द्वारकानाथ कोष्टी, निलेश शिंदे, आकाश दरवडे, वसंत शेलार, प्रवीण फाकटकर, संदीप भेगडे, योगेश राक्षे, पंढरीनाथ घुले, अनिल शेलार, अक्षय शेलार यासह आदी वृक्षप्रेमी यावेळी उपस्थित होते. विविध संस्थांच्या माध्यमातून व सहकार्यातून सुमारे अडीच हजार रोपे लावण्यात येत आहे. लागवडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध संस्थांना वृक्षरोपण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखा, प्लास्टिकचा वापर टाळा, आपला परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश यावेळी देण्यात येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)