घोराडेश्‍वर डोंगर परिसरात वृक्षारोपण

सोमाटणे : घोराडेश्‍वर डोंगर परिसरात वृक्षारोपण करताना डॉ. डी. वाय पाटील कॉलेज आंबीचे विद्यार्थी व शिक्षक.

सोमाटणे, (वार्ताहर) – डॉ. डी. वाय. पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय आंबीच्या वतीने घोराडेश्‍वर डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वृक्ष डोंगर उतारावर लावले यामध्ये आंबा, साग, चिंच, बोर, सिसे, सीताफळ, सागवान आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमात कॉलेजच्या इलेक्‍ट्रिनिक ऍड टेलीकम्युनिकेशन विभागाचे द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेले जवळपास 50 च्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्याचबरोबर शिरगाव येथील शारदाश्रम आश्रम शाळेत जावून येथील अनाथ व गरीब मुलांना खाऊ व स्टेशनरीचे वाटप केले. यावेळी आश्रमाचे प्रमुख विजय लोखंडे, प्राध्यापिका भक्ती मुखेडकर, अश्‍विनी गाडेकर, प्रशांत पाटील, सुनिता येवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आरती गाडे, नेहा पाटील, आकाश पवार, सुमित नायकरे, स्नेहल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)