घोरपडवाडीच्या जि. प. शाळेला पाणी शुध्द करणारे यंत्र भेट

निमसाखर- घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गेली काही दिवसांपूर्वी बेळगाव येथील कुटुंबाने पाणी शुध्द करणारे यंत्र भेट दिली. या कार्यक्रमावेळी होनवाड कुटुंबाला घोरपडवाडी या गावाची प्रसिध्द असलेली आणि गावचा पारंपरिक व्यवसाय असलेली “घोंगडी’ भेट देऊन सत्कार करण्यात आला. घोरपडवाडी हे गाव सर्वसाधरण तीन हजार लोकसंख्या असलेले पण घोंगडी व्यवसायाने प्रसिध्द असलेले आणि पाणी फाउंडेशनचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले हे गांव आहे. 1 मे 2017 रोजी हे होनवाड कुटुंब महाश्रमदानासाठी घोरपडवाडीला आले होते. त्यावेळी गांवासाठी काही करण्यासाठी इच्छा त्यांनी ग्रामस्थांजवळ व्यक्त केली होती. त्याप्रमाणे या घोरपडवाडी शाळेला विद्यार्थ्यांसाठी पाणी शुध्द करणारे उपकरण (यंत्र) मिळावे, अशी मागणी झाली. त्याप्रमाणे या गावालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकतेच पाणी शुद्धीकरण यंत्र बेळगांव (कर्नाटक) येथील रहिवासी राघवेंद्र होनवाड आणि तेजस्वी होनवाड या कुटुंबाने भेट देण्याचा आला. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच नंदा कांबळे, आण्णा धालपे, मारुती नाचण, बापूराव चांगण, शिक्षक गाडे, सुधाकर नाचन, काळेल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार मुख्याध्यापक शरद हगारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)