घोड धरण 95.51 टक्‍के भरल्याने 9 दरवाजे उघडले

निमोणे- चिंचणी (ता.शिरुर) येथील घोड धरणात बुधवारी (दि.22) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7393 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या धरण 95.51 टक्‍के भरल्याने धरणाचे 9 दरवाजे उघडून 10 हजार 440 क्‍युसेसने पाणी घोड नदीपत्रात सोडण्यात आले आहे, अशी माहिती घोड शाखेचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी दिली.
कुकडी प्रकल्पातील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने डिंभा धरणातून 7393 क्‍युसेस तर वडज धरणातून 550 क्‍युसेस पाणी घोड नदी पात्रात येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घोड धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 7638 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 5467 दशलक्ष घनफुट आणि मृत पाणीसाठा 2172 दशलक्ष घनफुट आहे. घोड धरणाला दोन कालवे असून उजव्या कालव्याची लांबी 30 किलोमीटर आणि डाव्या कालव्याची लांबी 84 किलोमीटर आहे. घोड धरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तसेच काष्टी आणि श्रीगोंदा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेलेले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून शिरुर तालुक्‍यात समधनकारक पाऊस पडलेला नसल्याने घोड धरणातील पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परंतु सध्या धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकरी सुखावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)