घोड धरणातून पाणी सोडले

मांडवगण फराटा- शिरुर तालुक्‍याच्या पूर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातून घोडनदीच्या नदीपात्रात पाणी सोडल्याने शिरुर तालुक्‍याच्या इनामगाव,तांदळी, शिरसगाव काटा, नलगेमळा या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. सध्या घोड धरणात 53 टके पाणीसाठा शिल्लक असून शिरुरच्या पूर्व भागात पाणी आल्याने नागरिकांमध्ये सध्यातरी समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. शिरुर तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला होता. त्यामुळे घोडनदीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. नागरिकांची गरज लक्षात घेऊन पाणी सोडण्याच्या संदर्भात शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शेतीसाठी घोडनदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घोडच्या जलसंपदा अधिकाऱ्यांनी घेतला आहे.घोडनदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे जोपर्यंत पूर्ण क्षमतेने सोडलेल्या पाण्याने भरत नाहीत. तोपर्यंत आर्वतन असेच सुरु राहणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.
ज्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याची गळती होत आहे. अशा कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यातील पाण्याची गळती होऊ नये यासाठी संबंधित ठेकेदाराने ताबडतोब उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. बंधारे भरल्यानंतर शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिकांना देऊ नये. बंधारे पूर्ण क्षमतेने भरले की, नागरिकांनी देखील पाण्याची गळती होत असेल तर लगेच संबंधित ठेकेदाराला कळवावे. जेणेकरुन बंधाऱ्यातील पाणीसाठा शेतीसाठी अपुरा पडणार नाही. घोडनदीला सोडलेल्या पाण्यामुळे परिसरातील गावातील विहिरींना व कुपनलिकांना पाणी वाढणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)