घोडेगावात सोमवारी जागतिक अपंग दिन

मंचर-दरवर्षी प्रमाणे यावर्षी 58वा जागतिक अपंग दिन सोमवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या घोडेगाव येथील कार्यालयात साजरा होणार आहे. अशी माहिती अपंग संघाचे दिपक ढोबळे यांनी दिली. यावेळी शासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून अपंग व्यक्तींना स्वावलंबन कार्ड वाटप करुन संजय गांधी पेन्शन योजनांची प्रकरणे, अपंग वित्त महामंडळ यांची कर्ज प्रकरणे, विशेष अपंग व्यक्तींनी केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि त्यांचे सत्कार, अपंग व्यक्तींच्या विविध समस्या सोडविण्याचे काम या जागतिक अपंग दिनानिमित्त करणार आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील सर्व अपंग व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन अपंग संघाचे कार्यकर्ते दीपक ढोबळे, समीर टाव्हरे, ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)