घोडनदीला आला पूर

मंचर-आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागात गेल्या आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरण पाणीसाठ्याची झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत कुकडी प्रकल्पात सुमारे 32.13 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी (दि. 17) सकाळी 8 वाजेपर्यत येडगाव धरणात 64.30 टक्‍के, माणिकडोह 33.17 टक्‍के, वडज 47.70 टक्‍के, पिंपळगाव जोगा धरण 32.13 टक्‍के, चिल्हेवाडी धरणात 73.42 टक्‍के, डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेणू जलाशयात) सुमारे 49.70 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. रविवार दि. 9 ते दि. 17 पर्यंत सकाळी 8 वाजेपर्यत सर्व धरणात जवळपास 30 ते 35 टक्‍के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
आदिवासी डोंगरी भागात पावसाला जोर नसला तरी संततधार पाऊस पडत आहे. पावसाला सातत्य असून धरणाच्या जलाशयात पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. डिंभे धरण कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असून सोमवारी (दि. 17) सकाळी आठ वाजेपर्यत सुमारे 49.70 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला जेमतेम 32.13 टक्‍के पाणीसाठा होता. जवळपास 17 टक्‍के पाणीसाठा यावेळी ज्यादा असल्याचे दिसून येत आहे. धरणक्षेत्रात एकूण 628 मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. गोहे खोऱ्यातील तलाव पाण्याने भरला असून तेथून बाहेर पडणारे पाणी डिंभे धरण हुतात्मा बाबू गेणू जलाशयाच्या पायथ्याला असणाऱ्या घोडनदीद्वारे पावसाच्या पाण्याचा पूर सुरू आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आंबेगाव -जुन्नर तालुक्‍याला वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात सुमारे 32.13 टक्‍के पाणीसाठा झाल्याची माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जे. बी. नन्नोर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)