घोडनदीतील 22 केटी बंधारे पाण्याखाली

मंचर-घोडनदीला आलेल्या पुरामुळे आंबेगाव-शिरूर तालुक्‍यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि शेतजमीन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः जलसंपदा विभागाला पूर परिस्थितीचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले.
जलसंपदा विभागाचे 22 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे घोडनदी पात्रात आहेत. बंधाऱ्याचे ढापे पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने काढून घेतले होते; परंतु घोडनदीला आलेल्या पुराने नदीकाठावरील बाभळीची झाडे, नदीतील जलपर्णी, गवत, लाकडे इत्यादी वस्तु पुराच्या पाण्यामुळे वाहून आल्याने बंधाऱ्यातील मोऱ्यांना त्या वस्तू अडकल्या आहेत. पुराचे पाणी तुंबल्याने नैसर्गिक प्रवाह बदलून नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या जमिनीतील उभ्या पिकांमध्ये पाणी घुसल्याने पिकांसह जमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बंधाऱ्यावरून जाण्या-येण्यासाठी सुरक्षिततेसाठी लावलेले लोखंडी पाइपाचे कठडे आणि सिमेंटचे अस्तरीकरण वाहून गेले आहे. विशेषतः घोडेगाव जवळील गोनवडी येथील बंधाऱ्यात झाडे झुडपे मोठ्या संख्येने अडकल्याने पाण्याचा प्रवाह बदलून शेतीपिकांमध्ये पाणी घुसले. तसेच गोनवडी गावाच्या दिशेने बंधाऱ्याकडून जाणारा रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
या बंधाऱ्याची पाहणी पंचायत समिती उपसभापती नंदकुमार सोनावले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसेपाटील, घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, गिरवली सरपंच संतोष सैद, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वनविभागाचे कर्मचारी अनिल शिंदे, कपिल काळे, राजू काळे, नन्नु काळे, नरेंद्र काळे, निलेश काळे, अंकुश काळे यांनी केली. पुरामुळे जलसंपदा विभागाने मोठे नुकसान झाले आहे. गुरूवारी रात्री घोडनदी पात्रात डिंभे धरणाच्या सांडव्यावरून, गोहे पाझर तलाव आणि ओढ्या-नाल्यांचे सुमारे 25 हजार क्‍युसेकने पाणी नदीपात्रात आल्याने पूर परिस्थितीमुळे नदी काठावरील शेतीपिके, जलसंपदा विभागाचे बंधारे यांचे मोठे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)