#व्हिडिओ : घोडगंगा साखर कारखाना वीज निर्मितीसाठी सज्ज 

सहवीज निर्मिती प्रकल्पाची यशस्वी चाचणी : अध्यक्ष अशाेक पवार यांची माहिती

न्हावरे, प्रतिनिधी – योगेश मारणे
न्हावरे (ता.शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची यशस्वी चाचणी आज (दि. १६) घेण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक प्राचार्या गोविंदराजे निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे पूजन करण्यात आले.
२०.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी करून दोन वर्षांपासून बंद होता. त्यामुळे कारखान्याचे व शेतकऱ्यांचे सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, असे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने अनेक प्रयत्न केले; परंतु प्रकल्प सुरू होण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेवटी कारखान्याच्या शिष्टमंडळाने देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा यासाठी विशेष लक्ष घालावे, अशी गळ घातली होती. अखेर शरद पवार यांच्या प्रयत्नाने व मध्यस्थीमुळे कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा शासनासोबत करार झाला व पुढील काळात कोट्यवधी रुपयांचे होणारे नुकसान टळले. कारखान्याचा आगामी गाळप हंगाम सुमारे १८० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालेल, असा संचालक मंडळाचा अंदाज आहे. त्यामुळे कारखान्याला सुमारे ४०कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कारखान्याच्या सहवीज निर्मितीप्रकल्पातून मिळू शकतात, याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी होणार आहे.
शासनाने घोडगंगा सहकारी साखर करखाण्यासोबत ४रुपये ९९पैसे प्रति युनिट दराने वीज खरेदी करार केला आहे. हा दर इतर साखर कारखान्यांच्या तुलनेने कमी असून कारखान्याला सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक तोटा होणार आहे. शिवाय शासनाने स्व-वापरावरही विद्युत शुल्क आकारले आहे. त्यामुळे कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांना होणारा वीजपुरवठा एमएसइबीकडून घ्यावा लागणार आहे.
सुमारे ७३कोटींपेक्षा अधिकचा तोटा  सहवीजनिर्मिती प्रकल्प दोन वर्षे उशिरा सुरू झाल्याने घोडगंगा कारखान्याला झाला आहे. तसेच एस.डी.एफ.चे कारखाना विस्तारीकरणासाठी मंजूर असलेले २५ कोटी रुपये कारखान्याला विस्तारीकरणासाठी सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण नसल्याने वापरता आले नाहीत. त्यामुळे अधिकच्या उत्पन्नाचे पैसेही कारखान्याला मिळाले नाहीत. उलट कारखान्यावर आर्थिक अडचण निर्माण झाली व कारखाना विस्तारीकरणाला वेळ लागला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1153 :thumbsup:
279 :heart:
116 :joy:
68 :heart_eyes:
116 :blush:
0 :cry:
86 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)