घोडगंगा कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संतोष रणदिवे

न्हावरे-शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी रांजणगाव सांडस येथील संतोष तुकाराम रणदिवे यांची आगामी एक वर्षासाठी सर्वानुमते आज (दि. 1) बिनविरोध निवड करण्यात आली.
दुसऱ्या संचालक सहकाऱ्याला कारखान्याचे उपाध्यक्ष होण्याची संधी मिळावी म्हणून, प्रा. सुभाष कळसकर यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी आज कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते संतोष रणदिवे यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला. निवडीनंतर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार ऍड. अशोक पवार व संचालक मंडळाच्या वतीने नूतन उपाध्यक्ष संतोष रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)