घोडगंगानजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू

न्हावरे -(ता.शिरुर) येथे चौफुला राज्यमार्गावर घोडगंगा साखर कारखान्या नजीक मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघाताच्या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेत कुंडलिक बाबासाहेब कुसेकर (वय 48, रा.आंधळगाव, ता.शिरुर) यांचा मृत्यू झाला.

या अपघाताच्या घटेनेबाबात शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कुंडलीक कुसेकर हे आपल्या दुचाकीवरुन न्हावरे येथून आंधळगावला घरी जात असताना घोडगंगा कारखान्याच्या बाजूने येणाऱ्या मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कुंडलिककुसेकर गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी न्हावरे आणि शिरुर येथे हलविण्यात आले उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कुंडलिक कुसेकर यांची न्हावरे आणि आंधळगाव परिसरात प्रगतशिल बागायतदार आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून ख्याती होती. आंधळगाव येथील समर्थ रायपनिंग बनाना उद्योगाचे ते अध्यक्ष होते. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबासहेब कुसेकर यांचे ते पुत्र होत. तर आंधळगाव सोसायटीचे
अध्यक्ष आदिक कुसेकर यांचे ते बंधू होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)