पिरंगुट- आयोध्यात राम मंदिर व्हावे यासाठी घोटावडेफाटा येथील शिवशक्ती चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मुळशी तालुका शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने ही आरती घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे, उपजिल्हा प्रमुख बबन दगडे, तालुका प्रमुख संतोष मोहोळ, महिला सघंटक स्वाती ढमाले, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष राम गायकवाड, युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन खैरे, उपतालुका प्रमुख वैभव पवळे, सुरेश मारणे, हिराबाई पडळघरे, गणेश भोईने, नागेश साखरे, दिलीप गोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाप्रमुख संतोष मोहोळ व मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0