घोटावडेत हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

पिरंगुट- घोटावडे (ता. मुळशी) येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. या शिबिराचे उद्‌घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर, सरपंच अभिजित वायकर, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य डॉ. एस. के. ढगे, प्राचार्य डी. एस. इचके आदी उपस्थित होते. उपसचिव एल. एम. पवार म्हणाले, चांगल्या सवयी, व्यायामाचे महत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन, तणावमुक्त जीवन हे आरोग्यदायी जीवनाचे मूळसूत्र आहे. या सवयी आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरातून अंगी बाळगाव्यात. सरपंच अभिजित वायकर म्हणाले की, श्रमसंस्काराबरोबरच अभ्यासपूरक माहिती आपणास दिली जाईल. योग्य अयोग्य गोष्टींची माहिती आपण आम्हाला दिल्यास गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. अर्जुन डोके, डॉ शरद गिरमकर, प्रा. विद्या पाठारे, प्रा. सुवर्णा खोडदे, प्रा.विक्रम मालतुमकर, प्रा.अमृता इनामदार, प्रा. विपुल घेमुड यांनी शिबिराचे नियोजन केले आहे. प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर जांभुळकर, सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)