पिरंगुट- घोटावडे (ता. मुळशी) येथे बापुजीबुवा खिंडीत एका अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळला असून याप्रकरणी पोलीस-पाटील अर्चना सुधीर गोडांबे यांनी पौड पोलिसांना खबर दिली आहे.याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बापूजीबुवा खिंडीत रस्त्याच्या कडेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या पुरुषाचे वय अंदाजे 40 ते 45 आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट असून पांढऱ्या रंगाची लुंगी घातली आहे. मृतांची उंची पाच फूट सात इंच आहे. अंगाने मध्यम सडपातळ असून दाढी पांढरी आहे. पौड पोलिसांच्या वतीने तपास चालू असून कोणाला काही माहिती असल्यास पौड पोलीस ठाण्यात 020-22943133 या क्रमांकर अथवा पोलीस हवालदार अब्दुल शेख (मोबाईल 9923312828) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पौड पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)