घेरा पानवडीत पहिले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक साहित्य संमेलन

काळदरी – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जयमल्हार क्रांती संघटना यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवारी (दि. 24) राज्यस्तरीय पहिले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलना अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले यांची निवड करण्यात आली आहे. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी दिली.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पानवडी येथे होणाऱ्या या संमेलनात उद्‌घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, नाट्यप्रयोग, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावरील परिसंवादात सागर चव्हाण, संतोष शिंदे, श्री ऐक्के सहभागी होणार आहेत. उद्‌घाटन प्रसंगी प्रा. डॉ. नारायण टाक यांचे व्याख्यान होणार असून सांयकाळी चार वाजता कविसंमेलन होणार आहे. कविसंमेलनामध्ये शरद गोरे, किशोर टिळेकर, शशिकांत गरुड, हनुमंत चांदगुडे, अभिषेक अवचार, जगदीप वनशीव, रमेश रेडेकर, शुभम वाळुंज, मधुकर गिलबिले, सोमनाथ सुतार, स्वाती बंगाळे, अलका तालनकर, नुरजॅंहा पठाण, बबन चखाले, किसनमहाराज चव्हाण, अक्षय कोलते, निखिल जगताप, प्रमोद डोंगरदिवे, चंद्रकांत चाबुकस्वार, अलका बनकर, राजेंद्र सोनवणे, फुलचंद नागटिळक, शिवाजी झुरंगे, सागर शिंदे आदी कवी सहभागी होणार आहेत.
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गंगाराम जाधव असून प्रमुख पाहुणे जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलतनाना शितोळे असणार आहेत. संमेलनाचे निमंत्रक प्रा. गौतम बेंगाळे, राजाभाऊ जगताप व मोहनराव मदने आहेत. या संमेलनाचे संयोजन साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, उपाध्यक्ष नंदकुमार दिवसे, शहराध्यक्ष रमेशबापू जगताप हे करीत आहेत. पुरंदर व वज्रगड किल्ल्याया पायथ्याला राजे शिवराय विद्यालय, घेरा-पानवडी (ता. पुरंदर) येथे साहित्य संमेलन होणार आहे. राजे उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्याचे पहिले बंड ज्या परिसरात सुरु केले. त्याच ठिकाणी संमेलन होत असल्याने संमेलनाला विशेष महत्त्व आहे. या परिसरानजीकच त्यांचे जन्मठिकाण असलेले भिवडी गाव आहे. यावेळी साहित्य परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष गंगाराम जाधव यांचा शिक्षणातील सेवापुर्तीनिमित्त मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे दशरथ यादव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)