घेरापानवडीत पाणी पुरवठा योजनेत महाघोटाळा

सासवड- पुरंदर तालुक्‍यातील घेरापानवडी गावच्या पाणी पुरवठा योजनेत लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे याप्रकरणातील संबंधित दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी घेरापानवडी गावच्या गावकऱ्यांनी सोमवारी पुरंदर पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
घेरापानवडी गावात अस्तित्वात नसलेली व सन 1991 ची नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली दाखवून या योजनेच्या दुरूस्तीसाठी 15 लाख रुपयांचा प्रस्ताव दाखल केला. यामध्ये जीर्ण झालेली पाईपलाईनची दुरूस्ती, इलेक्‍ट्रीकल पंप व पाण्याची टाकी बांधण्यासाठी सरपंच व ग्रामस्थांना विश्वासात न घेता मौजे घेरापानवडी घेरापुरंदरचे ग्रामसेवक नानासाहेब गरड, ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेचे पुरंदर तालुका पंचायत समितीचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याने संगनमताने सन 1991 ला प्रस्ताव दाखल केला.
गावात कोणतीही नळपाणी पुरवठा योजना झालेली नसताना सदर योजनेच्या दुरूस्तीसाठी 15 लक्ष रूपयाचा प्रस्ताव दाखल करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. संबंधित प्रस्ताव दाखल करताना ग्रामसेवकांनी मौजे घेरापानवडी या गावासाठी विहीर खोदणे, संपूर्ण गावात पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, इलेक्‍ट्रीक पंप घेणे व गावामध्ये व्यक्तीगत नळ कनेक्‍शन देण्यासाठी सरपंच व ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु त्यांनी असे न करता केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी खोटा प्रस्ताव दाखल केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलकांनी सांगितले कि, ही बाब गंभीर असून पदाचा व अधिकारांचा गैरवापर करणारी आहे. त्यामुळे संबंधितांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लेखी तक्रार देउनही आतापर्यंत संबंधितांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याचा निषेध करण्यासाठी घेरापुरंदर ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन साहेबराव ढगारे यांच्या नेतृत्वाखाली घेरापानवडी गावच्या ग्रामस्थांनी पुरंदर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केले. यावेळी माजी आमदार एल. टी. सावंत, पुरंदर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, भाजपचे आर. एन. जगताप, मयूर मुळीक, विष्णु भोसले, अमोल जगताप उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)