घेतलेल्या शेअरची किंमत खाली जाते तेव्हा वाईट वाटते? (भाग-१)

एका विशिष्ट कंपनीचा शेअर किती भारी आहे हे सांगत माझा मित्र सांगत असताना मी ऐकले. त्याचे ऐकून मी त्या कंपनीचे शेअर खरेदी केले. काही दिवसांतच त्या कंपनीच्या शेअरचा भाव निम्म्यापेक्षा खाली घसरला तेव्हा मला खरोखरच वाईट वाटले. असेही वाटले की, आपण त्याचे ऐकले नसते तर बरे झाले असते.

पण त्यावेळी मला का वाईट वाटले याचे कारण तुम्हांला माहित आहे का?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदी साधे आणि एकमेव कारण आहे. मला त्या कंपनीबद्दल फारसे ज्ञान नव्हते आणि आता माझे पैसे कधीही परत मिळणार नाहीत असे वाटले.

जेव्हा शेअरची किंमत खाली जाते तेव्हा तुम्हांला वाईट वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या कंपनीबद्दल ज्ञान नसणे. तुम्ही त्या कंपनीबद्दल माहिती घेतली नाही तर शक्यता अशी असते की, जेव्हा जेव्हा शेअरचा भाव खाली जाईल तेव्हा तेव्हा तुम्हांला वाईट वाटेल. त्यातून मग तुमच्याकडून भावनेवर आधारीत निर्णय घेतला जाईल आणि तुम्ही आणखी पैसे गमवाल.

घेतलेल्या शेअरची किंमत खाली जाते तेव्हा वाईट वाटते? (भाग-२)

जितकी अधिक माहिती तितकी भिती कमी

तुमच्याबाबतही अशीच समस्या असेल तर लगेचच तुम्ही घेतलेल्या शेअरच्या कंपन्यांविषयी माहिती मिळवायला सुरवात करा. तुमच्या लक्षात येईल की, जितकी जास्त माहिती तुम्ही मिळवाल तितकी तुमच्या मनातील भिती कमी होत जाईल आणि तुम्हांला स्वस्थ वाटू लागेल आणि वाईट वाटणे कमी होईल. त्याचे कारण म्हणजे आता तुमच्या मनात असे गृहितक तयार झालेले असते की, आपण चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी केलेले आहेत.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)