घेतलेल्या शेअरची किंमत खाली जाते तेव्हा वाईट वाटते? (भाग-२)

घेतलेल्या शेअरची किंमत खाली जाते तेव्हा वाईट वाटते? (भाग-१)

ज्ञान, अनिश्चितता आणि वाईट वाटणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच अनिश्चितता नको असते. त्यातही पुन्हा आपल्या आर्थिक भवितव्याविषयी अनिश्चितता असेल तर मग आणखीनच वाईट वाटत राहते. सुदैवाने यावर मार्ग आहे. तुम्ही अनिश्चित गोष्टींबद्दल जितकी माहिती आणि ज्ञान संपादन कराल तितकी तुमच्या मनातील भितीची भावना कमी होत जाईल. तुम्ही काहीच केले नाही तर तुमच्या मनातील भिती वाढत राहिल. त्यामुळे सकारात्मक कृती करा आणि अनिश्चितता निघून जाईल.

गुंतवणूक आणि भावनांवर नियंत्रण

अऩेकदा तुम्ही तारीख, त्या दिवसाचा शेअरचा भाव आणि त्यावेळी शेअर घेतले तर काय भाव राहिल या हिशेबाने डायरीत नोंदी करून ठेवता. अशा काल्पनिक पण वास्तवतेला धरून शेअरचे भाव असलेल्या खरेदी-विक्रीत अनेकजण फायदा कमावतात. काही वेबसाईटवरही अशी प्रात्याक्षिकासाठी अकाऊंट उघडण्याची आणि काल्पनिक खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची सुविधा असते. त्यातील व्यवहारात अनेकांना फायदा होतो. कारण तिथे त्यांना काहीच गमवायचे नसते. ते सगळे फक्त प्रात्याक्षिकापुरते असते आणि काळजी करायचे काहीच कारण नसते. त्यामुळे कुठलीही व्यक्ती चांगल्या प्रकारे निर्णय घेते. कमीत कमी चुका करते आणि जास्त पैसा कमावते. गुंतवणूक करणे फार अवघड नसते. फक्त त्यासाठी भावनांवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. जेणेकरून तुमच्याकडून घोडचुका होणार नाहीत. अनेकदा गुंतवणूकदार माहिती आणि ज्ञान असूनही चुका करतात कारण अशा घटनांमध्ये त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवता आलेले नसते.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)