घुसखोरीची वाळवी ! (भाग 1)

स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि दलालांची मिलीभगत


मजुरी आणि वेश्‍याव्यवसायात संख्या सर्वाधिक

संजय कडू

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांगलादेशी नागरिकांना फक्‍त 5 ते 15 हजारांत “इंट्री’

पुणे – अल्‌ कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन तिघा बांगलादेशी नागरिकांना पुणे शहरातून अटक करण्यात आली. यामुळे अनधिकृतपणे राहाणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्‍न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. विशेषत: अशा वातावरणात पुणेकर, राज्यातील नागरिक आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलीस आणि इतर तपास यंत्रणा करतात तरी काय? असा प्रश्‍न घोंघावत आहे.

वेश्‍याव्यवसायात बांगलादेशी तरुणींची तस्करी

वेश्‍याव्यवसायात बांगलादेशी तरुणींची संख्या दखल घेण्याजोगी आहे. मुंबई तसेच पुण्यातील “रेड लाईट एरिया’मध्ये बांग्लादेशी तरुणी हमखास आढळून येतात. या तरुणींना नोकरीच्या आमिषाने दलालांनी फसवणूक आणलेले असते. तर काही दलाल तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वेश्‍याव्यवसायात ढकलतात. या तरुणींची 25 ते 50 हजार रुपयांत विक्री करण्यात येते. तर अनेकदा गरिबीपोटी घरचेच त्यांना दलालांना विकून टाकतात. अल्पवयीन तसेच अल्पशिक्षीत असल्याने त्या या दलदलीत सहज अडकल्या जातात.

संबंधित वृत्त – घुसखोरीची वाळवी (भाग २)

 

आधार आणि पॅनकार्डही…

या बांगलादेशी नागरिकांची पश्‍चिम बंगलामध्ये “इंट्री’ झाल्यावर रेल्वेने त्यांना मुंबईमध्ये आणले जाते. तेथे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून दिले जाते. आधारकार्ड व पॅनकार्ड अवघ्या 400 ते 500 रुपयांत बनवून दिले जाते. यानंतर त्यांना सुरुवातीला रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे हे कामगार भारतातच राहतात. सीमापार करून आलेले बांगलादेशी नागरिक मिळेल त्या मजुरीवर रोजंदारीची कामे करतात. बांधकाम साईटवर तसेच बाजारामध्ये ओझे उचलतात. पडेत ती कामे करुन झोपडपट्टी किंवा पदपथावर ते जगतात. बांगलादेशातील गरिबीमुळे पोट भरण्यासाठी भारतात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मध्यंतरी झालेल्या एका सर्वेनुसार एकट्या मुंबई शहरात बांग्लादेशी नागरिकांची संख्या 40 लाखांच्या आसपास असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर 2009 मध्ये तब्बल 1,300 बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी त्यांच्या देशात परत पाठवले होते. सध्या नवी मुंबईतही बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. दरम्यान, मधल्या काही काळात राजकारणी संघटनांनीदेखील बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याचा इशारा दिला होता. मात्र, याकडे सध्यातरीह दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यावर आता योग्य पावले उचलण्याची गरज आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)